रूमचं
दार उघडून अनघा बाहेर आली तर तिला निनाद सोफ्यावर मेल चेक करताना दिसला.
“गुड
मोर्निंग.” अनघा त्याच्याकडे हसत बोलली.
“वेरी
गुड मोर्निंग princess” तीला एक नाटकी सलाम ठोकत निनाद ने प्रत्युत्तर दिले.
“कधी
आलास?” आपले मोकळे केस बांधत अनघाने विचारलं.
“आत्ता
just आलो. तू ये फ्रेश होऊन. मी चहा बनवतो तोपर्यंत.”
“ओके
बॉस” म्हणत अनघा फ्रेश व्हायला गेली. आंघोळ करून ती बाहेर आली तोपर्यंत निनाद
साहेब चहाचे कप टी-पॉय वर मांडून सोफ्यावर पाय पसरून आडवे झाले होते.
खुर्चीवर
बसत तिने चहाचा घोट घेतला.
“ह्म्म्म,
मस्तं झालाय चहा” ती समाधानाने उद्गारली.
“Thanks”
अर्धवट डोळे उघडत तो उठून चहा पिऊ लागला.
“सिगरेट
आहे तुझ्याकडे? माझ्या काल रात्री संपल्या.” तीने विचारलं.
त्याने
काहीही नं बोलता खिशातून पाकीट आणि लायटर काढून टेबलावर तिच्याकडे सरकवलं.
“Thanks.
तू नाही घेणार?” आपली सिगारेट पेटवत तिने विचारलं.
“नाही
गं. आत्ता येता येता रफिक चं हॉटेल उघडं दिसलं. मस्तं डबल हाफ फ्राय खाल्लं, एक
मलाई मारके चहा घेतला. शांतपणे एक सिगारेट मारली आणि मग आलो वर. आणि हो, तुझ्याकरता
भुर्जी आणली आहे पार्सल करून. फ्रिजवर ठेवली आहे. खाऊन घे नंतर.” निनाद ने उत्तर
दिलं.
“क्या
बात है? आज खूप खातिरदारी करतोय तू माझी? चहा, सिगरेट, भुर्जी. काय स्पेशल?”
“बस
काय यार. सहजच केलं मी. त्यात काय विशेष”
“मस्करी
केली रे. ते जाऊदे. काल काय खूप काम होतं ऑफीसमध्ये? खूप दमल्यासारखा वाटतोस
म्हणून विचारतेय.” अनघाने काळजीने विचारलं.
“काम
होतं खरंतर खूप. पण ते काय चालूच असतं. थोडंसं अनईझी वाटतंय एवढंच.”
“ठीक
आहे रे. आता इतक्या दिवसांनी नाईट शिफ्ट करतोयस म्हणून होतंय असं. आता सवय नाही
राहिली तुला नाईटची. बाकी काही नाही.” अनघा म्हणाली.
“तसंच असेल कदाचित. आणि तसंपण आज
आणि उद्या वीक ऑफ आहे मला. आणि नंतर जनरल शिफ्टमध्ये आहे मी.” निनाद ने तिला
सांगितलं.
“असं
असेल तर खूप चांगलं आहे. बरं चल मी आवरून घेते आता. खिचडी बनवून ठेवते. दुपारी
खाऊन घे.”
“अगं
नको! मी घेऊन येईन खालून काहीतरी.” निनाद लगेच बोलला.
"चुतियागिरी
नको करूस. एकतर आधीच तब्येत बरी नाही त्यात बाहेरचं खात बसलास तर अजून आजारी
पडशील.” अनघा जवळ जवळ ओरडलीच त्याच्यावर.
“अरे
मातोश्री ऐका माझं” निनाद हात जोडत तिला म्हणाला “पहिली गोष्टं म्हणजे मी आजारी
नाही. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्टं अशी कि मला थंडगार खायला नाही आवडत. वाटलं
तर माझं मीच काही तरी बनवून खाईन. तू
टेन्शन नको घेउस.”
“बरं
ठीक आहे. बघू आपण. मी ऑफिसची तयारी करते तू पण आराम कर.” जराशी शांत होत अनघा
म्हणाली.
“ओके.
एकदोन मेल्स पाठवायचे आहेत. तेवढे पाठवतो आणि झोपतो.” निनाद उठून laptop उघडत म्हणाला.
अनघा
तिची तयारी करायला बेडरूम मध्ये गेली तसा निनाद गाणी लावून मेल्स चेक करत बसला.
किचन आवरून नाश्ता वगैरे आटपून अनघा ऑफिसला जायला निघाली तर निनाद laptop तसाच छातीवर
ठेवून सोफ्यावरच झोपला होता. तिने हळूच laptop टेबलावर ठेवला. तशीच परत बेडरूम
मध्ये जाऊन अनघा ने एक जाड रजई आणली आणि
निनाद च्या अंगावर अलगद पसरली. निनाद लहान बाळासारखा गाढ झोपला होता. त्याच्या केसांमधुन
हात फिरवायचा तिला मोह झाला. तिने हात उंचावला देखील होता, तेवढ्यात निनादच्या
मोबाईल च्या आवाजाने ती दचकली. निनाद पण धसकून जागा झाला. डोळे उघडले तर समोर अनघा
हात उंचावून मारायच्या अविर्भावात उभी.
“काय
झालं?” त्याने विचारलं
केस
विस्कटलेला, जागरणामुळे लाल झालेले डोळे तिच्याकडे वटारून पाहणारा निनादचा चेहरा बघून अनघाला खुदकन हसूच फुटलं.
“काही
झालेलं नाहीये. फोन वाजतोय तुझा फक्तं.”
“शिट
यार! हे ऑफिस वाले साले शांतपणे झोपू पण देत नाही.कसली मस्तं डुलकी लागली होती माहितीये?”
निनाद वैतागत म्हणाला.
“चांगलंच
माहिती आहे.” त्याच्या हातात फोन देत अनघा म्हणाली. “बरं मी निघते आता. खाली
रेणुका बाईंना सांगून जातेय मी. दुपारी डबा पाठवतील त्या. खाऊन घे आणि आराम कर.
कुठे भटकायला जाऊ नकोस.”
तिच्या
प्रत्येक वाक्याला हो-हो म्हणत निनादने
फोन घेतला.
“चल
येते म्हणत अनघाने हलकेच त्याच्या गळ्यात मागून हात टाकला, आणि त्याच्या केसांवर
ओठ टेकून ती मागे फिरली. बिल्डिंग मधून बाहेर पडताना सवयीप्रमाणे तिने वर खिडकीकडे
पाहिलं तर नेहेमीसारखाच आजपण निनाद तिला खिडकीतून हात दाखवत बाय करत होता. फरक
इतकाच कि आज तो फोन वर बोलत होता. त्याला हसून हात दाखवत अनघा गाडीत बसली.
संध्याकाळी
चावीने दार उघडून अनघा आत आली तेव्हा चेरी आणि निनाद सोफ्यावर गप्पा मारत बसले
होते.
“हाय
चेरी. कशी आहेस” पायातल्या चपला सरकवत अनघाने विचारलं.
“एकदम
मजेत.” अनघाला मिठी मारत चेरी म्हणाली “तू कशी आहेस?”
“जिवंत
आहे अजून” नाटकी उसासा सोडत अनघा म्हणाली “तू बस ना.”
“नाही
नको. निघते मी” पर्स खांद्याला लावत चेरी म्हणाली.
“अरे
तुमचं काही प्रायव्हेट बोलणं चाललं असेल तर आत जाते मी. नो प्रॉब्लेम.” निनाद कडे बघत
अनघा बोलली.
“तसं
काही नाही गं. तुझीच वाट बघत होते. म्हटलं तुला भेटूनच जाईन. मकरंद पण येतंच असेल
इतक्यात.” अनघाचा हात धरत चेरी म्हणाली.
“बस
गं. बरेच दिवस भेटले नाही तुम्ही लोकं. पाहिजे तर मक्याला पण बोलवून घेऊ इथेच.
उद्या तशीपण सुट्टी आहेच. थोडे ड्रिंक्स घेऊ. जेवा आणि जा आरामात. वाटलं तर इथेच
राहा आज. काय घाई आहे.” अनघा आग्रह करत बोलली.
“अनु
जाऊदे तिला. नको जबरदस्ती करूस.” इतका वेळ गप्पं बसलेला निनाद मधेच म्हणाला.
“अं....नको.
नंतर कधीतरी पार्टी करू आपण. आय प्रॉमिस. आज निघते मी.” चपला घालत चेरी म्हणाली.
“ठीक
आहे. नीट जा” चेरीला मिठी मारून अनघा म्हणाली “आणि काळजी घे स्वतःची.”
अनघाच्या
बदललेल्या टोन मुळे चेरी जराशी चमकली.
“नक्की.”
स्वतःला सावरत चेरी म्हणाली. “चल निनाद येते मी.”
निनाद
तोपर्यंत दरवाजात आला होता.
“मी
येऊ सोडायला?” त्याने विचारलं.
“नको
रे! जाईन मी एकटी.” निनादला आलिंगन देत ती हलकेच त्याच्या कानात पुटपुटली
“Thanks
फॉर एवेरीथिंग.”
“ठीक
आहे गं.” हलकेच तिची मिठी सोडवत निनाद म्हणाला “नीट जा. आणि पोहोचल्यावर एक मेसेज
टाक.”
“नक्की
टाकते. चल बाय. बाय अनघा. येते मी.” म्हणत चेरी गेली देखील.
“आज
लेट झाला तुला?” दरवाजा लावत निनाद ने विचारलं.
“हो
रे. आज ट्राफिक लागला थोडासा.” बांधलेले केस मोकळे करत अनघाने उत्तर दिलं.
“चहा
घेणार. आत्ताच बनवला होता चेरीने. थोडासा जास्तच केलाय तिने आपल्या सेकंड राउंड
करता म्हणून.”
“घेऊया
की. आयता चहा कोण सोडेल.” अनघा हसत हसत म्हणाली.
“मग
मला पण एक कप ओतून आण ना. प्लीज प्लीज प्लीज.” निनादने नाटकी विनवणीच्या स्वरात
अनघाला विचारलं.
“फटके
द्यायला पाहिजे तुला.” त्याच्या हातावर एक चापटी मारत अनघा म्हणाली. “बस. आणते.”
चहाचे
कप घेऊन अनघा बाहेर आली तेव्हा निनाद सिगरेट पीत बसला होता.
“तुझी
सिगरेट आहे तुझ्याकडे?” तिच्या हातातून कप घेत निनादने विचारलं.
“हो
आहे.” आपली सिगरेट पेटवत अनघाने विचारलं “चेरी ची तब्येत थोडी डाऊन वाटली ना?”
“माहित
नाही गं. मी काही नोटीस नाही केलं.” तिची नजर चोरत निनाद म्हणाला
“हो
का?” खट्याळ स्वरात अनघाने विचारलं “बरं कितवा महिना चालू आहे तिचा?“
निनादच्या
तोंडातून चहा फुर्र करून बाहेर पडला. ठसका लागून तो जोरजोरात खोकू लागला.
“अरे
हळू जरा हळू“ म्हणत अनघा पटकन उठून त्याची पाठ ठोकायला लागली वरून तोंडाने हळू-हळू
असं जप चालूच होता. थोडासा सावरल्यावर त्याने तिचा हात झटकून टाकला.
“अगं
ए बाई. थोडं हळू थोपट ना.” तो जवळ जवळ खेकसलाच तिच्या अंगावर.
“तुला
च्यायला असंच ठोकायला पाहिजे. काय तर म्हणे माहित नाही गं. मी काही नोटीस
नाही केलं.
तुला
काय मी चु ....” निनादच्या चेहऱ्याकडे बघून तिने शब्द फिरवला “चु चुकीची वाटले.
सांगायचं नसेल तर स्पष्ट बोल ना. खोटं कशाला बोलतोस.”
“शांतं
हो माते शांत हो.” निनाद तिच्यापुढे गुडघ्यावर हात जोडून बसला. “लेकराची चुकी
पोटात घे माई. आई तुला रविवारी बोकड खायला घालेन” असं म्हणता म्हणता तो नाटकीपणे
घुमायला लागला “झालंच तर २ बाटल्या बिअर पाजेन पण तू शांत हो.”
“उठ
भक्ता देवी प्रसन्न झालेली आहे. फक्त रविवारी नवस फेडून टाक म्हणजे झालं. साला
नौटंकी.”
दोघेही
हसतच परत सोफ्यावर बसले.
“तुला
कसं कळलं?” निनाद ने तिला विचारलं.
“बाईची
नजर. अजून दुसरं काय?” तिने मगाशी घेतलेलं बेअरिंग अजून सोडलं नव्हतं.
“सरळ
सांग कसं कळलं ते. शो बाजी नको करूस.” तो जवळपास ओरडलाच.
“चेरीला
मागे एकदोन वेळा चक्कर आणि उलटीचा त्रास झाला होता हे तूच सांगितलं होतं मला.”
“पण
चक्कर तर कशानेही येऊ शकते ना?” निनाद ने मधेच तिला तोडायचा प्रयत्न केला.
“मला
पण काही विशेष वाटलं नाही त्यात. पण आज ती आल्यावर तू सिगरेट नाही प्यायलास.”
“आणि
हे कसं कळलं तुम्हाला?” निनाद ने विचारलं
“कारण
तू ash-tray सोफ्याखाली सरकवला होतास. जो तू आत्ता बाहेर काढलास. शिवाय मी
ड्रिंक्स चं नाव काढल्यावर तिचं उतरलेलं तोंड सगळंच सांगून गेलं मला. आणि महाशय तुम्ही
सोडायला निघाले होते तिला. तुझ्याकडून इतकं स्त्री-दाक्षिण्यं म्हणजे जरा अतीच
झालं नाही का.”
निनाद
ने कोपरापासून हात जोडले.
“अनघा
बाई तुम्ही ग्रेट आहात. तू डिटेक्टीव का होत नाहीस गं. शेरलॉक होम्स पेक्षा जास्तं
केसेस भेटतील तुला”
“हो
आणि मग तू एक पुस्तक लिही डिटेक्टीव अनु आणि निनू “
इतकं
बोलताना अनघाला खुदकन हसू फुटलं. निनाद ने जोडलेले हात तसेच टाळी साठी तिच्या पुढे
केले. ते हात तसेच धरून दोघेही खदाखदा हसत सुटले.